खिसा कापला गेलाय, भामटा लक्षात ठेवा; शिवसेना माजी आमदाराची राष्ट्रवादीच्या आमदारावर टिका

करमाळा – खिसा तर कापला गेलाय, धरणग्रस्तानी किमान भामटा तरी लक्षात ठेवावा असा मार्मिक हल्लाबोल  करमाळ्याचे शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांचे नाव न घेता केला. चिखलठाण येथील आयोजित उजनी पाणी परिषदेच्या सभेत ते बोलत होते. उजनी पाणी परिषदेची चौथी सभा आज चिखलठाण ता करमाळा येथे पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बबनराव सरडे, सरडे भाऊसाहेब, रामभाऊ नेमाणे, दत्तू जारकड, अजिनाथ सरडे, मोहनराव सरडे यांच्या हस्ते उजनी कलश पुजन करण्यात आले.

यावेळी अधिक बोलताना पाटील म्हणाले की उजनीच्या पाणी, प्रदुषण, पर्यटन, पुनर्वसन या सारख्या महत्वाच्या विषयावर या उजनी परिषदेत विचार मांडले जात आहेत. धरणग्रस्त व शेतकरीही यात सहभागी होऊन उजनीच्या भवितव्याविषयी आपले मत माडंत आहेत. सुमारे ४२ वर्षापासून रखडलेला पुनर्वसीत गावांच्या अठरा नागरी सुविधांचा प्रश्न मी सन २०१४ साली आमदार झाल्यानंतर सोडवला. पहिल्यांदाच पुनर्वसन विभागाकडून या कामांसाठी सुमारे २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.यात चिखलठाण, कुगाव या गावांसाठी २ कोटी ५७ लाखांघा निधी समाविष्ट आहे. आजही यातील कामे चालू आहेत. उजनी धरणावर आधारित मासेमारी व्यवसाय हा दुषित पाण्यामुळे धोक्यात आला आहे. उजनी हे परदेशी पक्षांचे स्थलांतरित ठिकाण असल्याने या धरणाबाबत राज्यपातळीवर विचारमंथन होणे गरजेचे आहे. तर उजनीच्या पाणी वाटप यंत्रणेवर आता राजकीय वर्चस्व वाढल्याने धरणग्रस्तांचे हक्कासाठी प्रत्येकाने जागरुक राहून उजनी विषयी चिंतन करावे लागणार आहे.

करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांना खुले आम फसवण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे.शेतकरी जाब विचारणारच आहेत. पण सध्या धरणग्रस्तांचे मनात धरणाविषयी चिंता असताना स्पष्टीकरण देण्याचे नैतिक धाडस आता आमदार महोदय यांचेत उरले नाही.धरणग्रस्तांच्या पाणी, वीज व नागरी सुविधांच्या साठी आपण कायम तत्पर राहून काम करणार असल्याचे ठाम आश्वासन माजी आमदार नारायण पाटील यांनी या परिषदेत दिले.

यावेळी सभापती अतूल पाटील, मा सभापती गहिनीनाथ ननवरे, आदिनाथचे माजी संचालक धूळाभाऊ कोकरे, नवनाथबापू झोळ, मा उपसभापती दत्ता सरडे, जि प सदस्य बिभीषण आवटे, बाजार समिती संचालक बापूराव रणसिंग,यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य जयप्रकाश बिले,प्रा अर्जुन सरक, पत्रकार तालूका संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, बहूजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम,मा सरपंच हनूमंत सरडे, महादेव पोरे, डाॅ कानगुडे, मच्छिंद्र सरडे, दिनकर सरडे, रावसो नेमाणे, मा सरपंच बाळासौ गुंड (शेटफळ), शहाबुद्दीन सय्यद, इन्नुसभाई शेख, गणेश जाधव, पत्रकार नासीर कबीर, बाळासो लबडे, सौमनाथ घाडगे, नवनाथ अवघडे, मारकड सर, स्वीय सहाय्यक सूर्यकांत पाटील, भीमराव घाडगे, शामराव गव्हाणे, सुखदेव नेमाणे, ज्ञानदेव मारकड-पाटील, भीमराव गव्हाणे,वजीर शेख, ज्ञानदेव भगत, उपसरपंच आनंद नाईकनवरे (शेटफळ), चेअरमन भाऊ साबळे, अजिनाथ कळसाईत, सागर पोरे, अॅड विजय कोकरे, विशाल तकुक, दत्तू सरडे, चंदू सुरवसे, ज्ञानदेव चोरमले, सुभेदार पाटील, शिवाजी पाटील, पपू पोळ, विठ्ठल नेमाणे, बापुराव नेमाणे, सुरज बोराडे, बिभीषण गुंड, रंगाशेठ पवार आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन युवानेते सागर पोरे यांनी केले तर आभार उद्योजक रावसाहेब नेमाणे यांनी मानले. या उजनी परिषदेत कुगाव, चिखलठाण २,१ तसेच शेटफळ व केडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.