प्रभाकर साईलच्या मृत्यूची पोलीस महासंचालकांमार्फत होणार चौकशी

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील (Cordelia cruise drug case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल (शुक्रवारी) प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.

मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता.

दरम्यान, एका बाजूला प्रभाकर साईल यांचे निधन झाले असताना आता दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाकर साईल यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, आता याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( HM Dilip Walse Patil ) यांनी तात्काळ पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले ( DGP Investigate Prabhakar Sail Death Case ) आहेत. प्रभाकर साईल यांचा संशयास्पद मृत्यू मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालकांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सुरुवातीला या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर या प्रकरणात प्राथमिक चौकशीत समोर काय समोर येते त्या दृष्टिकोनातून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप पाटील पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.