घरगुती गॅस सिलिंडर झाला आणखी महाग, जनता विचारतेय हेच का अच्छे दिन ?

Mumbai –  आजपासून घरगुती गॅस सिलिंडर महाग (Cylinder expensive) झाले आहेत. घरगुती 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात 18 रुपयांनी वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी कमी झाली आहे.

यापूर्वी जूनमध्ये बातमी आली होती की आता नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणेही महाग झाले आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या नवीन कनेक्शनच्या (New connection)  किमतीत प्रचंड वाढ केली होती. त्यानंतर नवीन ग्राहकांना गॅस कनेक्शन घेण्यासाठी 2200 रुपये खर्च केल्याची चर्चा समोर आली. यापूर्वी ही किंमत 1450 रुपये होती.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, 5 किलोच्या सिलेंडरची सुरक्षा आता 800 ऐवजी 1150 करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरप्रमाणे त्याचा रेग्युलेटरही (Regulator) महाग झाला आहे. यापूर्वी रेग्युलेटरसाठी 150 रुपये मोजावे लागत होते. मात्र नंतर यासाठी 250 रुपये देण्याची चर्चा झाली.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (Prime Minister Ujjwala Yojana) ग्राहकांनाही महागाईचा फटका बसला आहे. या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा रक्कम भरावी लागेल. मात्र, उज्ज्वला योजनेंतर्गत एखाद्याने नवीन कनेक्शन घेतल्यास, सिलिंडरची रक्कम पूर्वीप्रमाणेच द्यावी लागेल.

देशातील अनेक लोक 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे (Gas cylinder) दुहेरी कनेक्शन (Dual connection)  घेतात, जे तुमच्या स्वयंपाकघरात उपयोगी पडते. त्यामुळे ते रिफिल करणे सोपे जाते, तसेच गॅसची कमतरता भासत नाही. यापूर्वी दुहेरी कनेक्शनसाठी ग्राहकांना २९०० रुपये मोजावे लागत होते. मात्र आता दुहेरी कनेक्शन 4400 रुपयांना मिळणार आहे.