बाबासाहेबांचे वंशज म्हणून घेण्यास आपण ‘नालायक’ आहात; प्रकाश आंबेडकरांना भाजपचे प्रत्युत्तर  

Pradeep Gawade –  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे नेहमीच टीका करत असतात. मात्र एका भाषणात त्यांनी मोदींचा उल्लेख करताना नालायक मोदी असं म्हणत टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून देखील जशास तसे उत्तर देण्यात आले असून मोदींना नालायक म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना तुमची लायकी आहे का? असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.

भाजप प्रवक्ते प्रदीप गावडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर जशास तशी टीका केली आहे. आपल्या ट्वीट मध्ये ते म्हणतात, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नालायक म्हणण्याची प्रकाश आंबेडकर तुमची लायकी आहे का? तसेही बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देवून औरंगजेबाच्या थडग्यावर नतमस्तक होवून आणि माओवाद्यांना पाठीशी घालून बाबासाहेबांचे वंशज म्हणून घेण्यास आपण ‘नालायक’ आहात हे आपण सिद्ध केलेच आहे.असे म्हणत खोचक टीका गावडे यांनी केली आहे.