भय इथले संपत नाही : सतत होणाऱ्या विनयभंगाच्या त्रासाला कंटाळून दोन बहिणींनी उचलले टोकाचे पाऊल 

Crime News राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात (Pratapgadh District) दोन अल्पवयीन बहिणींनी विनयभंगामुळे आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेले दोन्ही अल्पवयीन चुलत बहिणी होत्या. काही मुले त्यांची सतत छेड काढत होते. यामुळे त्रस्त होऊन दोन्ही बहिणींनी हे पाऊल उचलले. या घटनेबाबत परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याच दरम्यान शनिवारी दोन्ही बहिणींनी एकत्र विष प्राशन केले. यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.हा खळबळजनक प्रकार प्रतापगड जिल्ह्यातील घंटाली पोलीस स्टेशन परिसरात उघडकीस आला आहे.

पिपळखुंट पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याच्या खोलीत राहून दोन्ही बहिणी शिक्षण घेत होत्या. यावेळी 3-4 तरुण गेल्या जुलै महिन्यापासून शाळेत जात असताना दोन अल्पवयीन बहिणींचा सतत विनयभंग करत होते. यामुळे दोन्ही बहिणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत्या. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, 5 ऑक्टोबर रोजी त्यांची या मुली शाळेतून परतत होत्या. दरम्यान, काही लोकांनी त्याचे अपहरण करून प्रतापगडमधील नकोडा नावाच्या ठिकाणी नेले. यानंतर दोन्ही बहिणी बेशुद्ध झाल्या. त्यावर आजूबाजूच्या लोकांनी काळजी घेत कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली.

5 ऑक्टोबर रोजी अपहरण झाल्यानंतर दोन्ही बहिणी खूप घाबरल्या होत्या. यावेळी पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर शनिवारी या घटनेने अस्वस्थ झालेल्या दोन्ही बहिणींनी विष प्राशन केले. त्यानंतर दोघांना उलट्या होऊ लागल्यावर त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. यावर कुटुंबीयांनी दोन्ही बहिणींना प्रतापगड येथे आणले. जिथे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान दोन्ही अल्पवयीन बहिणींची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उदयपूरला पाठवण्यात आले. मात्र त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

https://youtu.be/fTZWF6rmkXs?si=5iYeROzfJ4iPq1vf

महत्वाच्या बातम्या-

Israel : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इस्रायलमधल्या युद्धात अडकली; तळघरात लपली आणि संपर्कही तुटला

Israel : पॅलेस्टीनच्या विरोधात इस्रायलने केली युद्धाची घोषणा; स्वोर्ड्स ऑफ आयर्न मोहिमेद्वारे शत्रूला घडवणार अद्दल

विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता; Jagdish Mulik यांच्या पाठपुराव्याला यश