Manisha Kayande | ‘प्रियंका चतुर्वेदी रात्री ८ नंतर का उपलब्ध नसतात?’, शिवसेनेच्या मनीषा कायंदेंचे टीकास्त्र

Manisha Kayande | लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेच्या उद्धव गटाच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्या विधानाने महाराष्ट्रात राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी ईशान्य मुंबईतील प्रचारात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केलीय. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिले आहे, माझे वडील गद्दार आहेत. कोण आहेत एकनाथ शिंदे? गद्दार, असे टीकास्त्र त्यांनी सोडलेय. त्यांच्या या टीकेवरुन शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे.

आमदार आणि शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी प्रियंका चतुर्वेदींना प्रतिक्रिया दिली आहे. अनेक वर्षांपासून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून प्रियांका चतुर्वेदी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. प्रियांका चतुर्वेदी यांना लोकसभेत निवडून जायचे आहे. मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने आपण निवडून येणार नाहीत. म्हणून त्या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत. त्यांचेच लोक बोलतात की, त्या संध्याकाळनंतर भेटत नाहीत. ८ नंतर त्या उपलब्ध नसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तास लोकांसाठी उपलब्ध असतात. डॉ. श्रीकांत शिंदे देखील २४ तास लोकांसाठी उपलब्ध असतात. मग प्रियांका चतुर्वेदी का उपलब्ध नसतात ?, असा सवाल मनीषा कायंदे यांनी केला.

प्रियांका चतुर्वेदी यांना खासदारकी लढायची आहे. तर आपल्याबद्दल लोक काय बोलतात याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांच्याबद्दलचे रिपोर्ट्स काय सांगतात, याचे उत्तर प्रियांका चतुर्वेदी यांनी द्यावे, असे आवाहनही यावेळी मनीषा कायंदे यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती