ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटाची मोर्चेबांधणी; ठाकरे गटाला बसणार फटका

पालघर – आमदार रविंद्र फाटक यांनी तालुकानिहाय बैठका घेऊन शिवसेना-भाजपा युतीचेच वर्चस्व या निवडणुकीत दिसुन येईल असा विश्वास वाडा येथे बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना आमदार श्रीनिवास वणगा, आमदार शांताराम मोरे,जिल्हाप्रमुख राजेश शहा, भाजपाचे पालघर जिल्ह्यातील नेते बाबजी काठोळे, भाजप जिल्हाध्यक्ष नंदु पाटील, जि. प सदस्य प्रकाश निकम , मिताली बागुल, राजेश मुकणे,उपजिल्हाप्रमुख निलम संख्ये आणि शिवसैनिक उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात सध्या शिंदे गट आणि शिवसेना असा चढाओढीचा सामना रंगायला सुरुवात झाली असून, शिंदे गटाची मदार आमदार रवींद्र फाटक यांच्यावर असली तरी त्यांचा फारसा प्रभाव पालघर जिल्ह्यात दिसून येत नसल्याचे चित्र आहे, तर शिवसेनेचे काही जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटाकडे जाणार असल्याची चर्चा आहे.