आदित्य ठाकरेंनी शंंभर कोटी घेतले; रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

रत्नागिरी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर माजी मंत्री रामदास कदम(Ramdas Kadam)  यांनी खेडमध्ये बोलताना त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे शंभर कोटी रुपये घेतले, असा आरोप रामदास कदम यानी केला आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणारे पत्रही दिल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

शंभर खोके कोठून घ्यायचे हे त्यांना चांगलचं माहिती आहे.आता कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये.अडीच वर्षात ते कधीही बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री, नेता बाहेर ,अशी टीका रामदास कदम यांनी केली.सरकारनामाने याबाबत वृत्त दिले आहे.