Pune : प्रेमासाठी मुलीने नकार दिल्याच्या रागातून राजकीय नेत्यांना मागितली खंडणी; आरोपीला अटक

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यातील सर्वपक्षातील नेत्यांना फोन वरून खंडणीची मागणी केली जात होती. या प्रकारामुळे अनेक नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र आता खंडणी मागणारा तरूण आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय व्यक्तींना खंडणी मंगण्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या. यात भाजपचे आमदार महेश लांडगे, कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (BJP MLA Mahesh Landge, Congress corporator Avinash Bagwe and MNS corporator Vasant More)यांचा समावेश होता. त्यांनतर अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. चौकशीअंती पोलिसांनी इम्रान शेख या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. आता पुढची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संंबंधित प्रकरणाचा तपास केला. याआधी वसंत मोरे यांना धमकी दिल्याप्रकरणी इम्रान शेख यांना अटक करण्यात आली होती. इम्रान शेख हा एक विवाहनोंदणी संकेतस्थळ चालवत होता. हे काम करत असताना त्याला एक तरूणी आवडली होती. मात्र तरूणीने लग्नाला नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या इम्रान खाने ही तरूणी तिच्या कुटुंबियांना अडकवण्याचा कट तो रचत होता. एकतर्फी प्रेमातून घडलेला हा प्रकार आहे. केवळ प्रियसीला त्रास देण्यासाठी इम्रान हे सगळे प्रकार करत होता असं पोलिसांना सांगितलं आहे.