सुषमा अंधारे आणि राखी सावंत या बहीणी; पहा कुणी केला आता ‘हा’ मोठा दावा

मुंबई- ठाकरे गटाच्या फायरब्रँड महिला नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना भाजपा नेता मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bharatiya) यांची जीभ घसरली. मोहित कंबोज हे सातत्याने आपल्या ट्वीट आणि विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा एक ट्वीट केले आहे, ज्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना ‘ड्रामा क्विन’ राखी सावंत (Rakhi Sawant) हिची बहिण संबोधले आहे.

ट्वीट करत मोहित कंबोज यांनी लिहिले आहे की, ‘सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीत.. दोघीही एकमेकांच्या स्पर्धक आहेत, रोज कोण जास्त खळबळ माजवेल?, याची त्या दोघींमध्ये स्पर्धा होत असते.’ या ट्वीटवर आता सुषमा अंधारे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

You May Also Like