Pune Loksabha : लोकसभा इच्छुकांच्या मैदानात ‘ताकतवान’ नेत्याची धमाकेदार एन्ट्री, भाजपमध्ये चुरस वाढली

Pune Loksabha Election:- पुणे लोकसभेसाठी २०२४ च्या इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इच्छुकांच्या यादीमध्ये भाजपकडून शिवाजी माधवराव मानकर (Shivaji Mnakar) हे देखील पुणे लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं. शिवाजी मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहर अध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांचे बंधू आहेत. गेले कित्येक वर्षांपासून ते नाशिक शहरात भाजपमध्ये सक्रिय राहून काम करत होते. मात्र आता त्यांनी आपले मूळ गाव असणाऱ्या पुण्याकडे मोर्चा वळवल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढताना दिसत आहे. पुढे दिलेल्या लिंकवर करून पहा त्यांची विशेष मुलाखत.