पुणे-शिरूर उड्डाणपूल लवकर करावा; जगदीश मुळीक यांची नितीन गडकरींकडे मागणी

पुणे– आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे पुणे दौऱ्यावर आले असता जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी नगर रोडच्या वाहतुकीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली

यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की ,”नगर रोड परिसरात लोहगाव विमानतळ, खराडी आयटी पार्क, कल्याणी नगर, वडगाव शेरी या सर्वच भागातील रहिवाशांसाठी हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरातून नगर, औरंगाबाद व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांशी जोडणारा देखील हाच एकमेव महामार्ग आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे.”

यावेळी नितीन गडकरींनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित पुणे शिरूर या उड्डाणपूल प्रकल्पांची नेमकी स्थिती जाणून घेतली व या प्रकल्पातील मोजणी व भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करत रस्त्याच्या कामास प्रारंभ करणार असल्याचे संगितले.