प्रस्थापितांना नाकरुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे : मनसे 

चंडीगड : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल यायला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. यामध्ये आपची स्वबळावर सत्ता येईल असं चित्र आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

दरम्यान, महत्वाची माहिती म्हणजे पंजबमधील दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री पंदाचे उमेदवार असणारे चरणजीत सिंह चन्नी हे पिछाडीवर आहेत. तसेच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे देखील पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह हे देखील पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं आहे. प्रस्थापितांना नाकरुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे, असं त्यांनी म्हटलंय. इतकंच काय तर पर्या उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात, असंहीते म्हणालते. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पंजाबमधील मतमोजणी  दरम्यान समोर आलेल्या आकडेवारीनंतर विधान केलं आहे.