नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला; मनसे-भाजप युतीच्या चर्चेला उधाण

मुंबई : राज्यात काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका ठेपल्या आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, परंतु त्याआधी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackery- Nitin Gadkari Meet)  भेटीला गेले आहेत.  भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना गडकरी आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते.

नितीन गडकरींच्या (nitin gadkari) भेटीमागील टायमिंग याबाबत आता जोरदार चर्चा आहे. हा कुठलाही नियोजित दौरा नव्हता. राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक करण्यासाठी नितीन गडकरी थेट शिवतीर्थावर (shivtirth) पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. आज भाजप नेते दिवसभर राज ठाकरेंच्या समर्थनार्थ वक्तव्य करत होते.

नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते मोहीत कंबोज यांच्यापर्यंत सर्व नेते राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक करताना दिसून आले. त्यामुळे ही साखळी जोडली जातेय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कालच राज ठाकरेंचं भाषण काल भाषण संपल्यापासून सुरू आहे. त्यामुळे आता गडकरींच्या भेटीनंतर युतीची प्रक्रिया सुरू झाली आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.