Shirur LokSabha | मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखलाय, शिवाजी दादांचा दावा

पुणे | लोकसभेच्या चौथ्या टप्यात शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदारसंघात मतदान होणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात दावे प्रतिदावे आणि उत्तर प्रत्युत्तर सुरुच असल्याचं दिसत आहे. एकमेकांना वेगवेगळे आव्हान देताना दिसत आहेत. त्यावरुन आता आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.  मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव डॉ. अमोल कोल्हेनी आखला आहे. मी उत्तरं देत नाही असं जनतेला ते दाखवू इच्छितात, असा आरोप आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर  केला आहे.

‘मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखला आहे. मी उत्तरं देत नाही असं जनतेला ते दाखवू इच्छितात. असं म्हणत शिवाजी आढळरावांनी मी यापुढं कोल्हेंना प्रतिउत्तर देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, आढळराव पाटील अन् अमोल कोल्हे दोघेही प्रत्येक सभेत (Shirur LokSabha) एकमेकांवर विविध मुद्द्यांवर टीका करताना दिसतात. आता प्रचाराच्या शेवटच्या टप्यात कोणते मुद्दे चर्चेत येणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय