Narendra Modi | एनडीए सरकारच्या धोरणांमुळं गरिबांचं जीवन सुसह्य झालं; मोदींचा दावा

Narendra Modi | लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते देशाच्या विविध भागात अनेक प्रचार सभा आणि पथ फेरी घेत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी काल पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीच्या धुपगुरी ब्लॉकच्या झुमुर इथं जाहीर सभा घेतली. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या धोरणांमुळं गरिबांचं जीवन सुसह्य झालं आहे, असंही मोदी म्हणाले.

यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल राज्यातल्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारवर केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे आणल्याचा आरोप केला. I.N.D.I.A. गटाकडं देशाचे नेतृत्व करण्याची दृष्टी नाही असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान विदर्भदौरा
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला असून ठीकठिकाणी आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi)  आज चंद्रपूरमध्ये राज्यातल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ ते संध्याकाळी प्रचारसभा घेणार आहेत. मोरवा विमानतळ मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तसंच महायुतीतील घटक पक्षांचे नेतेही या सभेला उपस्थित राहणार आहेत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असून गडचिरोलीचे विद्यमान खासदार अशोक नेते गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी देखील पंतप्रधान मोदी येत्या दहा एप्रिलला प्रचारसभा घेणार आहेत. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघात या महिन्याच्या 19 तारखेला मतदान होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’

Shivajirao Adhalrao Patil | ‘जुन्नरमधून शिवाजीदादांना सर्वाधिक मते पडणार’, आमदार अतुल बेनकेंनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !