काश्मीरच्या अलिप्ततेचे समर्थन करणाऱ्या नेत्याची राहुल गांधींनी घेतली भेट

नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ब्रिटनचे माजी मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांची भेट घेतल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या या भेटीवर टीका केली आहे. सोमवारी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने जेरेमीसोबत गांधींचा फोटो ट्विट केला होता.

जेरेमी हे डावे नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी यापूर्वी भारतविरोधी विधाने केली आहेत.असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

लंडनमध्ये कॉर्बिन यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल गांधींवर हल्ला करत भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट केले की,  जेरेमी हे भारताविषयीच्या त्यांच्या नापसंतीसाठी ओळखले जातात, काश्मीरच्या अलिप्ततेचे समर्थन करतात आणि निःसंदिग्धपणे हिंदूविरोधी आहेत. गांधींना शेवटी त्यांचा परदेशातील सहकारी सापडला, जो त्यांच्या सारखाच भारताची बदनामी करतो.