केतकीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य कायम; आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळेला (Actress Ketki Chitale) मंगळवारी सात जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २०२० मध्ये बौद्ध धर्माविषयी (Buddhism)  समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकीवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (A case has been registered at Rabale police station) करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने पूर्वी तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याच प्रकरणामध्ये मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणात पहिल्या दिवसापासून स्मितहास्य पाहायला मिळाले. वैद्यकीय तपासणी दरम्यान केतकीच्या चेहऱ्यावर बिंधास्तपण आणि स्मितहास्य पाहायला मिळाले. केतकी पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत हसतांनाच पाहायला मिळाली. केतकीला कारागृहात नेण्याआधी ठाणे सिव्हिल रुग्णालयात (Thane Civil Hospital) वैद्यकीय तपासणीला नेले असतांना देखील केतकीच्या चेहऱ्यावरच हसू काही कमी झाले नाही.

सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांकडून विचारण्यात येत असलेल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर केतकी हसून देतांना पाहायला मिळाली. वैद्यकीय तपासणी दरम्यान केतकीचा रक्तदाब तपासण्यात येत असतांना ९०. ६१ इतका होता. तेव्हा माझा रक्तदाब नेहमीच असा कमी आणि नॉर्मल असल्याचे केतकीने डॉक्टरांना सांगितले.