‘लग्नही होईना आणि सत्ताही मिळेना म्हणून राहुल गांधी हताश झाले आहेत’

नवी दिल्ली-  जहांगीरपुरीमध्ये भाजपशासित एमसीडीच्या कारवाईनंतर विरोधक सातत्याने हल्लाबोल करत आहेत. याबाबत काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनीही केंद्र सरकारला घेरले आणि हा बुलडोझर भारतीय राज्यघटनेवर चालत असल्याचे सांगितले. त्याचवेळी भाजपचे (BJP) राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे.

भाजप नेते दिलीप घोष यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लोकांनी काँग्रेसला मनातून काढून टाकले असून आता देशातूनच काढून टाकणार असल्याचे म्हटले आहे. ते (राहुल गांधी) निराश झाले आहेत. इतके दिवस झाले, लग्नही झाले नाही. पक्ष सत्तेवरही येऊ शकला नाही, त्यामुळे कधी-कधी निराश होऊन असे प्रकार करतात. असं त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील जहांगीरपुरी येथील बेकायदा बांधकामांवर झालेल्या कारवाईबाबत ट्विट केले होते (tweet about illegal construction in jahangirpuri). ज्यात त्यांनी जहांगीरपूरमध्ये हा बुलडोझर चालवला नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक हा बुलडोझर देशाच्या संविधानावर चालत आहे. सरकार पुरस्कृत या मोहिमेचा उद्देश देशातील गरीब अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे हा आहे. भाजपनेही मनातील द्वेषावर बुलडोझर चालवावा.

दिलीप घोष यांच्या आधी भाजपच्या बड्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली होती. यादरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “ज्याचा इतिहास भ्रष्टाचार आणि दंगलीशी संबंधित आहे, त्यांच्याकडून अशीच अपेक्षा केली जाऊ शकते”.कोणीही चांगले करत नाही. त्यांनी देशाची प्रतिमा मलिन केली आहे.