साजिद खानने मला त्याचे गुप्तांग दाखवले आणि म्हणाला…; शर्लीन चोप्राचे गंभीर आरोप

मुंबई – जेव्हापासून साजिद खानची टेलिव्हिजनच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मध्ये स्पर्धक म्हणून निवड झाली, तेव्हापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. साजिद खान गेल्या दोन-तीन वर्षांत #MeToo अंतर्गत झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे. अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी पुढे येऊन साजिदवर आपल्या सत्तेच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात आवाज उठवला होता. हे प्रकरण इतके वाढले होते की साजिदला त्याच्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटातून त्याचे नाव वगळावे लागले.

आता शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. मीटू प्रकरणात अडकल्यामुळे चर्चेत आलेल्या साजिद खानवर अभिनेत्री शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. शर्लिनने ट्वीट करत साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. “साजिद खानने मला त्याचे गुप्तांग दाखवून शून्य ते १० दरम्यान रेटिंग दे असं म्हटलं होतं. आता मला ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन त्याला रेटिंग द्यायचं आहे. विनयभंग करणाऱ्या व्यक्तीबरोबर पीडित महिला कसा व्यवहार करते, हेदेखील देशाला बघू दे. सलमान खान कृपया तुम्ही याबद्दल काहीतरी भूमिका घ्या”, असं म्हणत तिने सलमान खानला ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.