कोलाकाताहून पुण्यात येऊन चोरी करायचे हे चोर; थाट एवढा होता की विमानाने यायचे-जायचे

पुणे – स्वारगेट पोलिसांनी (Pune Swargate Police) 2 चोर पकडले असून हे चोरटे कोलकात्याचे (Kolkata) आहेत असं तपासात समोर आले आहे. बंगालमधून हे चोर केवळ चोरीसाठी आणि मिळालेल्या पैशातून मौजमजा करण्यासाठी ते पुण्यात यायचे.

विशेष बाब म्हणजे हे दोन्ही चोर विमानाने कोलकाता येथून पुण्याला यायचे आणि सायकली चोरायचे. स्वारगेट पोलिसांनी त्यांना पकडल्यावर त्यांच्याकडून  तब्बल 35 सायकली हस्तगत केल्या आहेत. महागड्या सायकली चोरून हे चोर विकत असायचे.

चोरीच्या त्या सायकली किरकोळ किंमतीला विकायचे. मिळालेल्या पैशातून मौजमजा करून पुन्हा गावी जायचं  असा या टोळक्याचा कार्यक्रम असायचा. मात्र स्वारगेट पोलिसांकडे 10 ते 12 सायकल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्यावर त्याचा गांभीर्याने तपास करण्यात आला आणि या चोरट्यांना अटक करण्यात आली.