सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणाऱ्या अब्दुल सत्तार यांना राज ठाकरेंनी झाप झाप झापलं, म्हणाले…

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी मुंबईत सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चौफेर टीका केली. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलंच झापलं.

अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हल्ली कोणी काय येतंय काही बरळतंय. राजकीय पक्षाचे जे काही प्रवक्ते बोलत असतात अरे कोणती भाषा. मी असा महाराष्ट्र बघितला नाही. एक मंत्री एका महिलेला भिकारचोट म्हणतो. काय भाषा असते काय बोलत असतात. त्यांना वाटतं विनोद करतो.

तू कोण आहेस, आपली लायकी काय आपण काय बोलतो. मला भीती वाटते, आताचे तरुण हे पाहत असतील आणि ते म्हणत असतील असे असते का राजकारण? मग ठीक आहे, जातीपातीचे विष कालवण्यासाठी हे सुरू आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.