मदरशांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रद्द, केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – केंद्र सरकारने मदरशांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद केली आहे. त्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मदरशांतील १ ते ५ वयोगटातील मुलांना १००० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे. त्याचबरोबर 6 ते 8 वयोगटातील मुलांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती मिळत असे.

शिक्षणाच्या अधिकारांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत असल्याचा केंद्र सरकारचा विश्वास असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय इतर जीवनावश्यक वस्तूही विद्यार्थ्यांना दिल्या जातात. मदरशांमध्ये माध्यान्ह भोजन आणि पुस्तके मोफत दिली जातात. अशा स्थितीत सरकारने शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गतवर्षी यूपीतील सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला, ज्यामध्ये १६ हजार ५५८ मदरशांचा समावेश होता. दरम्यान, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच शिष्यवृत्ती मिळत राहणार आहे. त्यांचे अर्ज घेतले जातील.(Scholarship of first to eighth students studying in Madrasahs is cancelled, a major decision of the Centre).