राखी सावंत मुंबई पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या तिच्यावर नेमका काय आहे आरोप

Rakhi Sawant arrested :  बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर राखी सावंतबाबत (Bollywood actress-dancer Rakhi Sawant) महत्वाची बातमी समोर आली आहे. राखी सावंतला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. एका महिलेचा आपत्तीजनक व्हिडीओ शेअर केल्याचा राखीवर आरोप आहे. काही वेळेत अभिनेत्रीला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे.  मुंबईच्या सत्र न्यायालयाने कालच राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यानंतर आज तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.

एका मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.