चंद्राप्रमाणेच मुंबईतील रस्त्यांवरही खड्डे आहेत, ते दुरुस्त करा; राखी सावंतची पंतप्रधान मोदींना विनंती

Mumbai – भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान तीन मोहिमेचं प्रक्षेपण आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून करण्यात आले आहे. चांद्रयान तीनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, चंद्रावर अलगद यान उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसेच शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.

एल व्ही एम 3 या अग्निबाणाच्या सहाय्याने चांद्रयान तीनचं प्रक्षेपण करण्यात आलं. यामध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. 2019च्या चांद्रयान-दोन मोहिमेत सॉफ्टवेअर बिघाडामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर कोसळलं होतं. त्यामुळे आताच्या लँडरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. लँडर चंद्रावर अलगद उतरून तिथलं तापमान, तसंच भोवतालची कंपनं मोजून प्लाझ्मा घनतेचा अंदाज लावणार आहे; तर रोव्हर परिसरातील मूलभूत रचनेबाबत माहिती गोळा करणार आहे.

नरेंद्र मोदींनी चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं. अशातच राखी सावंतने (Rakhi Sawant) चांद्रयान 3 चा उल्लेख करतानाच नरेंद्र मोदींना एक वेगळीच विनंती केलीय.

‘हा एक मोठा दिवस आहे,आज पांढरे कपडे घालायचे आहेत कारण चांद्रयान 3 चंद्रावर गेले आहे. आज माझ्या साडीत चांदणेआहे, आज मी चांद्रयानसह स्वतःला कसे लॉन्च केले ते पहा. आज मला या महान यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करायचे आहे. मी पण एक वैज्ञानिक आहे. मी स्वतःला कसे लाँच केले ते तुम्ही पाहिले का?’, असे राखी म्हणाली.

राखी शेवटी म्हणते, ‘पॅरिसमधून चांद्रयान 3 पाहण्यासाठी त्यांच्याकडे दुर्बीण आहे का? मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की मुंबईतील रस्ते दुरुस्त केले तर बरे होईल. चंद्राप्रमाणेच इथे अनेक खड्डेही आहेत. माझा मूड खराब आहे, मोदीजींनी मला चांद्रयान 3 सारखं लाँच का केले नाही? मी रॉकेटसारखी लॉंच होईल आणि माझ्या चंद्राला भेटेल. मला सरळ जायचे आहे.’