Ketaki Chitale | लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? केतकी चितळेचा उद्धव ठाकरेंना सवाल, वाचा प्रकरण

Ketaki Chitale | उबाठाचे उत्तर पश्चिम मुंबई या मतदार संघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा प्रचार १९९३ च्या ब़ॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा सक्रियपणे करत आहेत, असा आरोप सातत्याने भाजप करत आहे. त्यासंदर्भात आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

केतकीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तीकरांना तसेच मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१ टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव.’ केतकीच्या या स्टोरीची खूप चर्चा रंगली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती