मी हिंदुत्त्ववादी पार्टीचाच आमदार आहे. युतीसाठी हिंदुत्त्ववादी पार्टीसोबत गेलो, तर त्यात काही चूक नाही’

मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली. यावेळी विधीमंडळात बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जोरदार बॅटिंग करत आपण आणि फडणवीस Devendra Fadnavis) मिळून आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. तसे जर झाले नाही मी शेती करायला निघून जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, शिंदे यांच्या या वक्तव्याचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनीदेखील समर्थन केले आहे. सोबतच हे सरकार पूर्ण वेळ टिकणार असून पुढील निवडणुकीत दोन्ही पक्ष २०० पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच मी हिंदुत्त्वावादी पार्टीचाच आमदार आहे, असेही सत्तार म्हणाले.

“मी शिवसेना पक्षाच्या चिन्हावरच निवडून आलो. धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आल्यानंतर मी काय एमआयएमचा आमदार (MIM MLA) आहे का? मी हिंदुत्त्ववादी पार्टीचाच आमदार आहे. युतीसाठी हिंदुत्त्ववादी पार्टीसोबत गेलो, तर त्यात काही चूक नाही,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.