भारतात चक्क आमच्यावर दगडफेक झाली होती, शाहिद आफ्रिदीचा खळबळजनक दावा

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने दावा केला आहे की २००५मध्ये भारताविरुद्ध कसोटी सामना जिंकल्यानंतर बंगळूरमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ्याच्या बसवर दगडाफेक करण्यात आली होती.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहिद आफ्रिदीने भारतातील परिस्थिती वाईट असल्याचे म्हटले आहे.

“आम्ही भारतात सामने खेळत होतो तेव्हा आमच्यासाठी दबावाचा काळ होता. चौकार-षटकार मारूनही आमच्यासाठी कोणी टाळ्या वाजवत नव्हते. बंगळुरू कसोटी सामना जिंकल्यानंतर आम्ही जेव्हा मैदानातून हॉटेलकडे चाललो होतो, त्यानंतर आमच्यावर दगडफेक झाली. खेळताना दबाव नेहमी राहतो आणि तुम्हाला त्या दबावाचा आनंद घेता आला पाहिजे,” असे शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे.