Shubman Gill Century | 4 धावांवरच बाद झाला असता शुबमन गिल, श्रेयस अय्यरमुळे असे पूर्ण केले शतक

Shubman Gill Century, IND vs ENG Test : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडला 399 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात स्टार खेळाडू शुभमन गिलने 104 (Shubman Gill Century) धावांची शानदार खेळी केली आहे.

या सामन्यापूर्वी गिल खराब फॉर्ममध्ये होता. मागील 6 कसोटी सामन्यांच्या 11 डावात त्याने एकही अर्धशतक झळकावले नव्हते. अशा परिस्थितीत हा सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. या डावातही गिल 4 धावा करून बाद झाला होता, मात्र श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) त्याला वाचवले.

गिलने डाव संपल्यानंतर हे मान्य केले. या डावात गिल दोनदा बाद होता होता वाचला. पहिली घटना दहाव्या षटकात घडली. त्यानंतर फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीच्या चौथ्या चेंडूवर गिलने फ्रंटफूट शॉट खेळला आणि चेंडू त्याच्या पॅडला लागला. हार्टलेच्या आवाहनावर अंपायरने गिलला आऊट दिला होता. यावेळी गिल 4 धावा करून खेळत होता. यानंतर गिलने श्रेयस अय्यरशी बोलून रिव्ह्यू घेण्याचे ठरवले. पॅडला लागण्यापूर्वी चेंडू त्याच्या बॅटला लागल्याचे अल्ट्राएजमध्ये दिसले. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. या घटनेचा संदर्भ देत गिलने आपल्या खेळीनंतर काही गुपिते उघड केली.

अय्यरच्या विनंतीवरून डीआरएस घेण्यात आला
गिल म्हणाला, ‘मला जीवनदान मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला, पण खरे सांगायचे तर तिथे माझ्याकडून काही चूक झाली होती. सर्वप्रथम, मला ते जाणवले देखील नाही (बॅटची धार मला लागली होती). त्यानंतर श्रेयस अय्यरने मला डीआरएस घेण्यास सांगितले. मी वाचलो हे पाहून मला खूप आनंद झाला.’

दिवसाचा खेळ संपल्यानंतर गिल म्हणाला, ‘तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना धावा करणे खूप महत्त्वाचे आणि समाधानकारक होते. यशस्वी आणि रोहितच्या विकेट्स गमावल्यानंतर ही इनिंग खेळताना बरे वाटले. आमच्यासाठी मोठी आघाडी घेणे खूप महत्त्वाचे होते.’

शुभमन गिलने शतक झळकावल्यानंतर अतिशय शांतपणे सेलिब्रेशन केले. यावर तो म्हणाला, ‘मला वाटले की अजून संघासाठी योग्य काम झालेले नाही. हेच कारण मी जोरात शतक साजरे केले नाही.’

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा