कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार उलथवून टाकणारे रामदास आठवले नावाचे वादळ

कागवाड – कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या भाजप उमेदवारांच्या च्या प्रचारासाठी वादळी सभा होत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी जनतेची ताकद महत्वपूर्ण असून त्या पार्श्वभूमीवर ना. रामदास आठवलेंचे वादळ कर्नाटक निवडणुकीत वाहत आहे. आज बिदर जिल्ह्यात भालकी येथे रामदास आठवले यांची भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

काल कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कागवाड विधानसभा मतदारसंघात भाजप चे अधिकृत उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी रामदास आठवले यांच्या तुफानी भाषणाला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला.