हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं, मेंदुत असतं : उद्धव ठाकरे

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच विरोधकांचा देखील ठाकरी शैलीत समाचार घेतला. (Uddhav-Thackeray-rally-in Mumbai).

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून राणा दाम्पत्य, भाजप (BJP),मनसे (MNS) यांना आपल्या फैलावर घेतले. हिंदुत्वाच्या मुद्यावरून विरोधकांना फटकारताना ते म्हणाले, तुमच विकृत हिंदुत्व आम्हांला मान्य नाही. हिंदुहृदयसम्राटांनी विचार दिला, तुम्हीं विखार पसरवत आहात. असे विखारी, विकृत हिंदुत्व आम्हांला मान्य नाही. हे सर्व मनोरुग्ण आहेत.

गेल्यावेळेस त्यांनी भगव्या टोप्या घातल्या. विचारलं की का घातली, तर म्हणे हिंदुत्व ना. अरे हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं, मेंदुत असतं. या गर्दीमध्ये जीवंतपणा आहे. सर्व वाघ आहेत वाघ.असं देखील ते म्हणाले.