Jay Pawar | जय पवारांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, लोकसभा निवडणुकीत होणार फायदा!!

Jay Pawar | बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघासाठी आज राजकीय नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी मतदारसंघात सभांचा धडका लावला आहे. तर अजित पवार यांचे धाकडे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांनी थेट मुंबईतून आंतरवाली सराटी गाठत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात बारामतीत मतदान होत आहे. त्याआधी जय पवारांची ही भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे.

सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची आज मतदारसंघात सांगता सभा होत आहेत. अशातच जय पवार यांनी मुंबईहून आज हेलिकॉप्टरने जालन्यातील अंतरवाली सराटीत धाव घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तर जरांगे पाटील यांनी देखील जय पवार यांचं स्वागत केल. या भेटीत दोघांमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही. तर भेटीनंतर जय पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय