राणा दाम्पत्याला कोर्टाचा दिलासा, राणा दाम्पत्याला जामीन मंजूर; 12 दिवसांनी कोठडीतून सुटका

मुंबई – राणा दाम्पत्याच्या (Navneet Rana and ravi Rana) जामीन अर्जावर आज निकाल दिला आहे. राणा दाम्पत्याला कोर्टाने दिलासा दिला असून राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन यापूर्वी राहणार दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता.(Rana couple granted bail)

सोमवारी निकाल येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते मात्र सोमवारी वेळेअभावी निकाल पूर्ण लिहू शकले नसल्यामुळे देण्यात आला नव्हता त्यामुळे चार मे रोजी निकाल देण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले होते त्यामुळे राणा दाम्पत्य यांना आज दिलासा मिळतो की जेलमधील मुक्काम वाटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17 तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. दरम्यान शनिवारच्या सुनावणीवेळी राणा दाम्पत्याच्या कोठडीत न्यायालयाकडून आजपर्यंत 4 मे पर्यंत वाढ करण्यात आली होती.