Sunil Tatkare | २०२९ मध्ये मोठ्या प्रमाणावर माझ्या महिला भगिनी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहायला मिळतील

Sunil Tatkare | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२९ मध्ये लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत, विधानपरिषदेत या देशातील माझ्या कर्तबगार महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले विचारांची ताकद आणि शक्ती वाढवली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी अलिबाग येथील महायुतीच्या जाहीर महिला मेळाव्यात केले.

२०२९ मध्ये मोठ्या प्रमाणावर माझ्या महिला भगिनी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहायला मिळतील. इतका विचार देशाचे पंतप्रधान नारी शक्तीबाबत करतात. महिलांसाठी अनेक योजना केंद्रसरकारने आणल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही अठरावी लोकसभा निवडणुक अत्यंत महत्वाची आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

चांद्रयान मोहिमेत ७० टक्के शास्त्रज्ञ महिलांचा सहभाग होता ही या देशात महिलांची उन्नती पाहू शकत आहोत याचा तुम्हा महिलांना अभिमान असला पाहिजे असेही वक्तव्य सुनिल तटकरे यांनी केले.

विरोधक शंभर टक्के निवडणूक हरणार आहेत. म्हणून मग मोदी आले की २०२९ नंतर निवडणूक होणार नाही अशी आवई उठवत आहेत. २०२९ ला निवडणूक होईल त्यावेळी यांना शोधून उमेदवार सापडणार नाही. म्हणून आज ते निवडणूक होणार नाहीत असे बोलत आहेत असा जोरदार हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी केला.

जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत
निवडणूकीतून यश प्राप्त करण्यासाठी केवळ… होय! हिंमत असेल तर मुद्द्यावर बोला… विकासाच्या मुद्यावर बोला…एखादी परराष्ट्रनीती मोदींनी घेतली त्यावर तुम्हाला बोलायचे ते बोला असे थेट आव्हान देतानाच जगभरातील विकसित राष्ट्रांची परिषद घेण्याचे धाडस ज्यावेळी दाखवले जाते आणि त्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष सन्मान करण्यासाठी पुढे येतो तो या देशाचा गौरव आहे हे मांडण्याची भूमिका प्रत्येक भारतीयांनी घेतली पाहिजे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

निवडणूकीसाठी इंडी अशी तथाकथित आघाडी निर्माण झाली आहे. आयुष्यभर पक्ष निर्माण झाले ते परस्पर विरोधी विचाराचे झाले. दोन ध्रुव जसे वेगवेगळ्या दिशेला असतात तसे यांची दोन भिन्न विचारांची टोकं जवळ आली आहेत. ते पण एकाच गोष्टीसाठी म्हणजे मोदींना विरोध करण्यासाठी यांचा फक्त व्यक्तीगत विरोध… व्यक्तीगत असूया, द्वेष आहे देश प्रगतीपथावर जातोय त्याचे काही नाही अशी जोरदार टीकाही सुनिल तटकरे यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय