मुंबई – राणा दाम्पत्याच्या (Navneet Rana And Ravi Rana) जामीन अर्जावर आज निकाल दिला आहे. राणा दाम्पत्याला कोर्टाने (Court) दिलासा दिला असून राणा दाम्पत्याला जामीन (Bail) मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन यापूर्वी राहणार दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता.
सोमवारी निकाल येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते मात्र सोमवारी वेळेअभावी निकाल पूर्ण लिहू शकले नसल्यामुळे देण्यात आला नव्हता त्यामुळे चार मे रोजी निकाल देण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले होते त्यामुळे राणा दाम्पत्य यांना आज दिलासा मिळतो की जेलमधील मुक्काम वाटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, नवनीत राणा (Navneet Rana) यांना स्पॉंडिलायसिस(Spondylosis) असून त्यांच्या जीवाला काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असं पत्र राणांच्या वकिलांना भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणांची प्रकृती (Navneet Rana Health) खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात (J.J.Hospital) दाखल करण्यात आले आहे.