Pune loksabha | अंतर्गत कलहामुळे कॉँग्रेसवर धंगेकरांसाठी बाहेरील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्याची वेळ

पुणे लोकसभा (Pune loksabha) मतदार संघात चौरंगी लढत होत असली तरी खरी लढत ही महायूतीचे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) विरुद्ध रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशीच होणार आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून , महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध समाज विविध घटक याबरोबरच मेळावे, वैयक्तिक भेटीगाठी आणि पदयात्रेच्या माध्यमातून सहाही विधानसभा मतदार संघ पिंजून काढले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एमआयएमचे अनिस सुंडके यांचाही त्यांच्या परीने प्रचार सुरू आहे.

रवींद्र धंगेकर यांना सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत कुरघोड्या आणि आघाडीतील सुंदोपसुंदीने ग्रासले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद यामुळे महायूतीच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतरही कॉँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर सर्वकाही अलबेल असल्याचे दिसत नाही. कॉँग्रेस वरिष्ठांचा स्थानिक नेतृत्वावरचा विश्वास उडालेला दिसतो आहे. कारण स्थानिक नेत्यांवर अवलंबून न राहता कॉँग्रेसला धंगेकर यांच्या प्रचारासाठी राज्यातील बारा आमदारांसह पराराज्यातील लोकप्रतिनिधींना पाचारण करण्याची वेळ आली आहे. शेवटच्या टप्प्यात कॉँग्रेसने उचलेले हे पाऊल रवींद्र धंगेकरांना तारणार का? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

मुरलीधर मोहोळ यांची आहे ही जमेची बाजू
पुणे लोकसभा (Pune loksabha) मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅंटॉन्मेंट या चार मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत.

हे पाचही आमदार आपपल्या मतदार संघात पूर्ण ताकदीनिशी मोहोळ यांच्या प्रचारात उतरले आहेत. वडगावशेरीमध्ये आमदार सुनील टिंगरे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यामुळे मोहोळ यांना दुहेरी ताकद मिळाली आहे. दरम्यान, सुरुवातीला उमेदवारी मिळण्यावरून असलेली इच्छुकांची नाराजीही संपल्याचे दिसून येत असून माजी खासदार संजय काकडे, सुनील देवधर हेही सक्रिय झाले आहेत. महायूतीचे घटक पक्षातील एकवाक्यता आणि नियोजनबद्ध प्रचार यामुळे मोहोळ यांच्या प्रचारात जोर दिसून येत आहे. राज्याचे नेतेही लक्ष ठेऊन आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन