राणीसावरगाव : श्री दत्तात्रय जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

राणीसावरगाव/विनायक आंधळे – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री दत्तात्रय जयंती (Shri Dattatraya Jayanti) निमित्त 14 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते साय. 4 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र ( दिंडोरी प्रणित ), सरकार वाडा, राणीसावरगाव (Ranisawargaon) येथे भव्य रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) आयोजन करण्यात आले आहे.

Blood Donation Camp

रक्तदान (Blood Donation) हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या दान केलेल्या रक्तामुळे कुणाची रक्ताची गरज भागू शकते, व त्याला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे श्री दत्तात्रय जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग दर्शवून रक्तदान करण्याचे आव्हान आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.