एकमेकांविरोधात लढलेले पक्षच आता मोदी पुन्हा सत्तेत आले तर निवडणूका होणारच नाही अशी आवई उठवतायत

Sunil Tatkare :- जे २७ पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले… ज्यांची आयुष्यभर विचारधारा परस्पर विरोधी राहिली आहे ते २७ पक्ष मोदी पुन्हा सत्तेत आले तर निवडणूका होणारच नाही… ही शेवटची निवडणूक असेल… संविधान बदलले जाईल… अशी आवई उठवणाऱ्या विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी अलिबाग शहरातील जाहीर प्रचार सभेत चांगलाच समाचार घेतला. मंगळवारी (३० एप्रिल) रात्री ८ वाजता अलिबाग शहरात महायुतीची जाहीर प्रचार सभा पार पडली.

आज आंबेडकरी जनतेच्या मनात साशंकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटना बदल आणि कायदे बदल यात फरक आहे. गतीमान सरकार करायचे असेल परराष्ट्र धोरण, परराष्ट्र नीती जगाच्या पाठीवर विकसित राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान मिळवायचे असेल तर काही बदल केले पाहिजेत हा निर्णय मोदींनी घेतला आणि आज विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने तुमचा आणि माझा गौरवशाली भारत त्या पंक्तीमध्ये बसला हे त्यांच्या कामाचे यश आहे. आणि जेव्हा विरोधकांना निवडणूकीत बोलण्यासाठी कुठला प्रश्न रहात नाही तेव्हा संविधान बदलणार अशा वावड्या उठवल्या जात आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

संजय राऊत तुमच्या रोखठोकमधून सोनिया गांधींवर टिका केलात त्याच सोनिया गांधींचे पाय धरत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले हा इतिहास कधी कुणाला विसरता येणार नाही असा टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

हेच संजय राऊत दिल्लीत चर्चेला जात होते त्यावेळी मीही कधी सोबत असायचो. तुम्ही सत्तेमध्ये आलात ज्या शिवसेनेने प्रखर हिंदूत्ववाद आयुष्यभर स्वीकारला असे म्हणत आलात त्यांनीच कॉंग्रेससोबत युती केली. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले अडीच वर्षे काम केले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मानसिक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे फेरबदल झाला. राजकारणात फेरबदल होत असतात. देशाच्या राजकारणात आघाडीची अपरिहार्यता आली तशी महाराष्ट्रामध्ये आली हेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

बहुजनांच्या हितासाठी… संघराज्याच्या कल्पनेमध्ये देश आणि राज्य एका विचाराचे असतील तर देश आणि राज्य गतीमान होते या हेतूने आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. मात्र आमच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे असे सांगतानाच त्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेला प्रसंग सुनिल तटकरे यांनी सविस्तरपणे कथन केला.

महत्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणार हार्दिक पांड्या

Anis Sundke | हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुलमानांचा सुद्धा, अनिस सुंडके यांचे प्रतिपादन

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर यांना उमेदवारी