Pune Congress | पुण्यातील कॉंग्रेस अंतर्गत निर्माण झालेले वाद आता कोण मिटवणार ?

Pune Congress |  कसबा पोटनिवडणुकीत चमत्कार केल्यानंतर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) पुणे लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र उमेदवारी जाहीर होण्याची आधी आणि त्यानंतर कॉंग्रेस अंतर्गत (Pune Congress) नाराजी समोर येऊ लागली. यातच नाराज कॉंग्रेसचे नेते आबा बागुल यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर काही दिवसांपुर्वी एक माजी आमदार आणि पदाधिकारी यांच्यात तू-तू-मै-मै- सुरु झाली झाली होती. वरिष्ठ नेत्यांच्या वादात कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण होत असताना धंगेकरांच्या प्रचाराचा वेग देखील मंदावत असल्याचं पुण्यात दिसून येत आहे.

रवींद्र धंगेकर यांच्या निवडणुक प्रचार प्रमुखपदी माजी आमदार मोहन जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही जबाबदारी जोशी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याने तसेच वरिष्ठ नेत्याचे हेवेदावे समोर येऊ लागल्याने धंगेकरांचा प्रचार मंदावला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीकडून तसेच कॉंग्रेसकडून पुणे शहाराच्या प्रभारीपदी विश्वजित कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र कदम सध्या सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत निर्माण झालेल्या वादामुळे त्यांना पुण्याकडे लक्ष द्यायला वेळ अद्याप तरी मिळालेला नाही. त्यामुळे प्रचाराला आता कमी कालावधी राहिला असताना रूसवे-फुगवे दुर करून सर्वांना एकत्र आणणार कोण ? असा प्रश्न कॉग्रेससमोर निर्माण झालाय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब