आलिशान हवेली, महागड्या गाड्या; अभिनेता रजनीकांत यांची संपत्ती ऐकून चक्रावतील डोळे

भारतीय सिनेसृष्टीचे ‘थलायवा’ शिवाजी राव गायकवाड ज्यांना संपूर्ण जग ‘रजनीकांत’ नावाने ओळखते. आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि हटके पात्रांनी त्यांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तसेच रजनीकांत यांना सर्वात डाऊन-टू-अर्थ अभिनेत्यांमध्येही गणले जाते. १९७५ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर रजनीकांत यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तर चाहते त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात.

रजनीकांत करोडोंचे मालक आहेत
आज त्याची एकूण संपत्ती आणि त्यांच्याकडे असलेल्या महागड्या कार कलेक्शनवर एक नजर टाकूया. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या रजनीकांत यांची एकूण संपत्ती ४३० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०१८ मध्ये फोर्ब्सच्या यादीत रजनीकांत ५० कोटींच्या वार्षिक उत्पन्नासह १४व्या क्रमांकावर होते. अलीकडील अंदाजानुसार, या सुपरस्टारला त्यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटासाठी १५० कोटी रुपये दिले जातील, ज्यामुळे ते भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनतील.

चेन्नईच्या पॉश गार्डन परिसरात रजनीकांत यांची एक मोठी हवेली आहे, जिथे शहरातील बहुतेक आघाडीचे उद्योजक, राजकारणी, अभिनेते आणि इतर श्रीमंत व्यक्ती राहतात. सूत्रांच्या माहितीनुसार या हवेलीची किंमत ३५ कोटी रुपये आहे. त्यांची पत्नी लता यांच्या मालकीच्या शाळेमध्येही रजनीकांत यांचा वाटा आहे.

महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत रजनीकांत
रजनीकांत महागड्या गाड्यांचे मोठे चाहते आहेत. त्यांच्याकडे १६.५ कोटींची रोल्स रॉयल्स फॅंटम आणि ६ कोटी रुपयांची रोल्स रॉयल्स घोस्ट आहे. अभिनेत्याकडे BMW X5 देखील आहे ज्याची किंमत ६७.९० लाखांपासून सुरू होते आणि १.७७ कोटींपर्यंत जाऊ शकते, २.५५ कोटींची मर्सिडीज-बेंझ जी वॅगन, ३.१० कोटींची एक लॅम्बोर्गिनी उरुस आणि प्रीमियर पद्मिनी, टोयोटा इनोव्हा आणि हिंदुस्थान मोटर्स या गाड्याही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीतील थलायवा रजनीकांत यांच्याकडे ५-६ कोटींची बेंटले लिमोझिन आहे, परंतु अभिनेत्याने त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार वाहन सानुकूलित केले आहे आणि त्याची किंमत तब्बल २२ कोटी आहे. रजनीकांत दरवर्षी आपल्या चित्रपटांसाठी ५० ते ६० कोटी रुपये घेतात. रजनीकांत यांची सध्याची संपत्ती १००-१२० कोटी रुपये आहे. इतकेच नव्हे रजनीकांत यांची जीवनकहानी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन (CBSE) च्याअभ्यासक्रमात ‘कंडक्टर ते सुपरस्टार’ या अध्यायात चित्रित करण्यात आली आहे.