रोहित मोठ्या मनाचा! हार्दिकसाठी सोडणार मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी, अश्विनचा दावा

Rohit Sharma Will Leave Captaincy For Hardik Pandya: भारताच्या अव्वल फिरकीपटूंपैकी एक रविचंद्रन अश्विनचा (Ravichandran Ashwin) विश्वास आहे की जर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार बनवले तर रोहित शर्मा पूर्ण नम्रतेने हा निर्णय स्वीकारेल, कारण भारतीय कर्णधाराला फारसा अहंकार नाही.

गुजरात टायटन्सचे दोन हंगाम कर्णधारपद भूषवल्यानंतर हार्दिक नुकताच मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्याने 2015 मध्ये मुंबई संघातर्फे आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो 2022 मध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील झाला आणि पहिल्या सत्रातच त्याने या संघाला विजेतेपद मिळवून दिले. रोहित सध्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे पण हार्दिक संघात आल्यानंतर त्याला कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथसोबत बोलताना सांगितले की, ‘रोहित शर्माला फारसा अहंकार नाही. तो एक अद्भुत व्यक्ती आणि खूप चांगला कर्णधार आहे. हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवल्यास तो ते पूर्ण नम्रतेने स्वीकारेल.’

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी