Karnataka Election Results: जाणून घ्या सीएम बसवराज बोम्मई शिगगाव मतदारसंघातून पुढे की मागे 

बंगळुरू : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात (Vote Counting) झाली आहे. एकूण 224 मतदारसंघांचे निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 2,615 उमेदवार उभे होते. त्यामुळे या सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. मात्र, जेडीएस हा पक्ष किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजप ही सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास भाजप दक्षिण भारतातून नामशेष होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील एकमेवर राज्यात सत्ता टिकवून ठेवणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात 200 जागांसाठीचे प्रारंभिक कल आले आहेत. यामध्ये भाजप-कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसची काहीशी सरशी पाहायला मिळत असली तरीही भाजप मध्ये आणि कॉंग्रेसमध्ये फारसे अंतर नसल्याचे चित्र आहे.

दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavaraj bommai) हे शिगगावमधून निवडणूक लढवत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 चे सुरुवातीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगावच्या पुढे आहेत. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई 2008 पासून तीन वेळा आमदार आहेत. बसवराज बोम्मई यांची शिगावमध्ये चांगली पकड आहे. शिगगावमधून काँग्रेसचे यासिर अहमद खान पठाण आणि जेडीएसचे शशिधर चन्नाबसप्पा यलीगर रिंगणात आहेत.