Relationship Tips: तुमचा लव्ह पार्टनर तुम्हाला देतोय धोखा, कसं ओळखायचं? घ्या जाणून

Relation Tips : कोणत्याही नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जसजसा विश्वास कमी होत जातो, तसतसा नात्यातील दुरावा वाढत जातो. विश्वासाबरोबरच एकमेकांवर असलेले प्रेम आणि एकमेकांप्रती असलेला सन्मान, कोणत्याही नात्याला मजबूत बनवतो. याबरोबरच एकमेकांतील गैरसमज वाढू न देण्यासाठी दोघांमध्ये मोकळेपणाने संवाद होणेही गरजेचे असते. बऱ्याचदा एकमेकांना वेळ न देऊ शकल्याने किंवा संवादाच्या अभावामुळे नात्यात गैरसमज निर्माण होताना दिसतात. याउलट जेव्हा दोन्ही जोडीदारांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो, तेव्हा त्यांच्यात भावनिक नाते निर्माण होते.

परंतु काही जोडीदार असेही असतात, जे आपल्या जोडीदाराच्या पाठीमागे नको त्या गोष्टी करत असतात, अर्थात आपल्या जोडीदाराला धोखा देत असतात. जर तुमचाही जोडीदार तुमची फसवणूक करत असेल तर तुम्ही अशावेळी काय कराल?, तुम्ही तुमच्या दगाबाज जोडीदाराला कसे ओळखू शकता?, तर चिंतेची बाब नाही. आम्ही तुम्हाला असे ३ प्रश्न सांगणार आहोत, ज्याचे उत्तर एक दगाबाज जोडीदार कधीही देऊ शकणार नाही.

चला तर पाहूया, काय आहेत ते ३ प्रश्न?

१. मी तुझा फोन वापरू शकते का?
दगाबाज जोडीदार कधीही तुम्हाला त्याचा मोबाईल फोन वापरू देणार नाही. तुम्ही जर अचानक त्याच्याकडे फोनची मागणी केली, तर तो काही ना काही बहाणेबाजी करून तुम्हाला फोन देण्याचे टाळेल. जेणेकरून तुम्ही त्याचा फोन तपासू शकणार नाही. कारण तुमच्या दगाबाज जोडीदाराला त्याच्या फोनमध्ये असलेली सीक्रेट चॅटिंग, फोटोज, किंवा कोणते रहस्य उघडकीस येण्याची भीती असेल.

परंतु हेही लक्षात ठेवा की, प्रत्येकवेळी असेच असू शकत नाही. कधी कधी तुमचा जोडीदार त्याचा फोन तुम्हाला न देण्यामागे वेगळे कारणही असू शकते.

२. सतत बिझनेस ट्रिप्सची कारणे सांगून बाहेरगावी जाणे
बहुतांश ऑफिसमध्ये लोकांना व्यावसायिक सहलीसाठी बाहेर जावे लागते. महिन्यातून एकदा किंवा दोनदा असे घडत असेल तर ते सामान्य आहे, परंतु जर तुमचा जोडीदार तुम्हाला बिझनेस ट्रिपचे निमित्त देऊन अनेक दिवस घराबाहेर राहत असेल, तर तुम्ही थोडे सावध राहायला हवे. अशा स्थितीत, तुम्ही त्यांना विचारू शकता की आजकाल इतक्या बिझनेस ट्रिप्स का होत आहेत?

३. तू माझी फसवणूक करत आहेस का?
जर तुमचा जोडीदार फसवणूक करणारा असेल, तर तो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कधीच देणार नाही. जर त्याने तुमच्या प्रश्नाचे उत्तर शांतपणे दिले तर समजून घ्या की, तो फसवणूक करणारा नाही. पण जर तो बहाणा करू लागला तर तो तुमची फसवणूक करत असेल.

या गोष्टीदेखील पाहून समजून घ्या की पार्टनर तुमची फसवणूक करत आहे
– खर्चाबद्दल सांगत नाही
– सोशल मीडियावर गुप्त खाते
– क्रेडिट कार्डची बिले लपवणे
– पूर्वीपेक्षा तुमच्या लूककडे अधिक लक्ष देणे
– फोन लॉक किंवा पासवर्ड
– खोटे बोलणे
– तुम्ही कधी काही सरप्राईज दिल्यास खूप राग येणे