कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही – मंगल प्रभात लोढा

मुंबई – महाराष्ट्रातील नांदेड, अमरावती, मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्देवी असून आम्ही त्यांच्या निषेध करतो. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर हिंसक घटना वाढत असून मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही असा इशारा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी दिला.

मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती येथील हिंसक घटनांच्या निषेधार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सीएसटी रेल्वे स्टेशन येथील अमर जवान ज्योत या स्थळी धरणे आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढत लोढा म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानतंर दंगलखोरांचा एक खास वर्ग सक्रिय होत हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. यासर्व हिंसक घटनामुळे राज्यातील हिंदू कुटुंबे आणि संस्थांचे नुकसान होत आहे. तसेच अफवांचा आधार घेऊन उघडपणे गुंडगिरी करत पोलिसांवर देखील लाठ्या-काठ्या, दगडफेक केली जात आहे. असला हिंसाचार मुंबईत होऊ देणार नाही असा इशारा मंगल जी यांनी दिला.

यावेळी मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते व आमदार प्रविण दरेकर, आमदार राहुल नार्वेकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार- पाटील

Next Post

आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले – उद्धव ठाकरे

Related Posts
sanjay raut

‘मुळात तुमची इच्छा हीच आहे की बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या’

 Pune – भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी (MVA)आणि खासदार संजय…
Read More
'त्या' व्हिडीओनंतर देखील सोमय्या झाले पुन्हा सक्रीय; आता सर्वात आधी करणार 'हे' काम

‘त्या’ व्हिडीओनंतर देखील सोमय्या झाले पुन्हा सक्रीय; आता सर्वात आधी करणार ‘हे’ काम

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे सध्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. हा…
Read More

पावसाळ्यात एकदा तरी बनवा ‘पोहे पकोडे’, जीभेचे चोचले पूर्ण करणारी सोपी रेसिपी आहे इथे

Poha Pakoda Recipe: मुसळधार पाऊस सुरू असताना गरम गरम पकोडे मिळाले तर पावसाचा आनंद द्विगुणित होतो. तसे, बटाटा,…
Read More