Eknath Shinde | बाळासाहेबांचे विचार सोडलेले उबाठा काँग्रेसमध्ये केव्हाच विलीन झाले, मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका

Eknath Shinde | ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान केले होते. त्याचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. बाळासाहेबांचे विचार सोडून उबाठा काँग्रेसमध्ये केव्हाच विलीन झाले आहेत. सत्तेसाठी त्यांनी सर्व सोडले. पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून उबाठा बसले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संगमनेरमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. आपले सरकार सत्तेत आल्यानंतर निळवंडे धरणाचे ५० वर्षानंतर उद्घाटन केले. ५०० वर्षांपासूनची राममंदीराची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. बाळासाहेबांसह करोडो रामभक्तांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले पण काँग्रेस नाराज होईल म्हणून त्यांच्या सुपूत्राला आनंद व्यक्त करत आला नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले आरोग्य योजनेत ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा सर्वच जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना रोटी, कपडा, मकान देण्याचे काम केले. विकास हाच महायुतीचा एकमेव अजेंडा आहे. ‘धनुष्यबाण रामाचा लोखंडे आपल्या कामाचा’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

दलित बांधवांसाठी, आदिवासी समजासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना सुरु आहेत. देशाचे सर्वोच्च पद आदिवासी महिलेला देऊन मोदी सरकारने आदिवासी समाजाचा सन्मान केला आहे. विरोधकांकडे झेंडा नाही, अजेंडा नाही, निती नाही, नियत नाही त्यांना केवळ मोदी व्देषाने पछाडले आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. काँग्रेस देशाचा दुश्मन असून ते पाकिस्तानची भाषा बोलत आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ करावा, हीच खरी देशभक्ती ठरेल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन