नवरा माझा नवसाचा : टीम इंडियाच्या विजयानंतर अनुष्काचा आनंद गगनात मावेना  

Anushka Sharma Post On india’s Win: आयसीसी पुरुष विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत (ODI World Cup 2023) भारतानं आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (INDvsAUS) काल चेन्नई इथं सहा गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी ठेवलेलं 200 धावांचं आव्हान भारतानं त्रेचाळीसाव्या षटकात चार गड्यांच्या बदल्यात पार केलं. विराट कोहली (Virat Kohli) आणि के एल राहुल (KL Rahul) यांची 165 धावांची भागिदारी निर्णायक ठरली. रविंद्र जडेजानं पाहुण्यांचे तीन गडी बाद केले.

दरम्यान, कोहलीची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) हा विजय साजरा केला. अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर खास पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला आहे. आयसीसीची पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने निळ्या रंगाचा हार्ट इमोजी तयार केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहलीसोबत केएल राहुलही दिसत आहे. अनुष्कासोबतच संपूर्ण देश टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण विराट कोहली आणि टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छा देत आहे.

महत्वाच्या बातम्या-

IND Vs AUS : कांगारूंची शिकार करत विश्वविजयाची भारताने केली सुरुवात; कोहली-राहुलची अप्रतिम कामगिरी

Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीला जाणं रविंद्र धंगेकरांनी टाळलं? समोर आलं मोठं कारण

सिक्कीमच्या ढगफुटीत बीडचा जवान शहीद; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार