भारत राष्ट्र समिती पक्षाची मुक्रामबाद येथे आढावा बैठक; डॉ. यशपाल भिंगे यांची उपस्थिती  

मुक्रामबाद – भारत राष्ट्र समिती पक्षाकडून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणीला सुरवात झाली असून राज्यभरात भारत राष्ट्र समिती सर्वच निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. या अनुशंघाने मुक्रामबाद येथे सदस्य नोंदणी च्या अभियाना संदर्भात भारत राष्ट्र समिती पक्षाचे मुखेड तालुका समन्वयक डॉ. यशपाल भिंगे यांच्या उपस्थितीत मुक्रमाबाद बैठक संपन्न झाली.

महाराष्ट्र – तेलंगना सीमा भागात भारत राष्ट्र समितीचा प्रभाव वाढत असून मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी नांदेड जिल्ह्यात विशेष लक्ष देत असून तेलंगना सरकारने शेतकऱ्यांना विषयी राबवत असलेल्या योजना महाराष्ट्र सरकार कडून राभवाव्यात असे आवाहन नेहमी करत असताना, राज्यात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात सुद्धा त्यांनी शेतकरी प्रश्ना संदर्भात प्रचारचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे.
मुक्रमाबाद सर्कल मध्ये गेल्या महिन्यापासून सदस्य नोंदणीला सुरवात झाली असून, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन हा पक्ष नागरिकांपर्यंत पोहचत आहे. त्यामुळे मुक्रमाबाद सर्कल मध्ये या सदस्य नोंदणी अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर बाराहाळी सर्कल मध्ये सदस्य नोंदणीस सुरवात झाली आहे. राज्याच्या 288 विधानसभा मतदार संघात हे अभियान सुरु असल्याची माहिती डॉ. यशपाल भिंगे यांनी दिली. पक्ष जोमाने वाढण्यासाठी कार्यकर्त्यांना त्यांनी अनेक सूचना दिल्या आहेत.