पुरुष डॉक्टर महिलांवर उपचार करू शकणार नाहीत; तालिबानचे नवीन फर्मान

तालिबानमध्ये (Taliban) महिला असणं पाप झालं आहे. येथे दररोज महिलांबाबत नवनवीन फर्मान काढले जातात. कधी शाळा-कॉलेजला जाण्यावर, तर कधी ऑफिसला जाण्यावर निर्बंध लादले जातात. या संदर्भात पुन्हा नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. नव्या  आदेशानुसार तालिबानमधील महिला पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेऊ शकणार नाहीत.

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र येथील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये फक्त मुलांना शाळेत जाण्याची परवानगी होती, बहुतेक किशोरवयीन मुलींना माध्यमिक शाळेतून बाहेर काढण्यात आले आणि अफगाण महिलांना आरोग्य आणि शिक्षण वगळता बहुतेक क्षेत्रांमध्ये काम करण्यास प्रतिबंधित करण्यात आले.

गेल्या वर्षी शिक्षणावर बंदी

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तालिबान सरकारने सर्व विद्यापीठांमध्ये महिलांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. हा आदेश ऐकून अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या शेकडो विद्यार्थिनींना मोठा धक्का बसला आहे. याविरोधात महिला रस्त्यावर उतरल्या. प्रखर विरोध झाला. या आदेशाबाबत काही पुरुषांनी महिलांच्या समर्थनार्थ निदर्शनेही केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले

त्याचबरोबर काही विद्यार्थीही सरकारच्या या आदेशाला विरोध करताना दिसले. अब्दुलहक ओमेरी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये विद्यार्थी विद्यापीठातून बाहेर पडताना दिसत आहेत. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "मुलींच्या शिक्षणावरील तालिबानच्या बंदीविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला विद्यार्थ्यांशी एकता दाखवण्यासाठी नांगरहार विद्यापीठाचे विद्यार्थी परीक्षा सोडत आहेत.