Shirdi LokSabha | वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर हल्ला

शिर्डी | वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा (Shirdi LokSabha) मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupvate) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षा रूपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर पळून गेले.

शिर्डी मतदारसंघात (Shirdi LokSabha) वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू असल्यानेच राजकीय सुडातून हा हल्ला झालं असल्याचे बोलले जाते. प्रस्थापित उमेदवारांना रूपवते यांचा निवडणुकीत धोका वाटत असल्याची चर्चा सुरू आहे.

उत्कर्षा रूपवते यांचे कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन –

रात्री अकोले राजूर ( जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना माझ्या कारवर दगडफेक झाली. मी सुखरूप असून या क्षणी राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे. कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये. कृपया संयम राखा. आपल्याला निवडणुक तडीस न्यायची आहे.उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे,आपण तिकडे भेटुयात असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन