महाराष्ट्रातील जनहिताच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय दुर्दैवी – छगन भुजबळ

नाशिक – महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने महाराष्ट्रभरातील जनहिताच्या मंजूर कामांना स्थगिती दिली आहे. हा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. त्यांच्या हस्ते येवला शहरात रस्ते कॉक्रिटीकरण, भूमिगत गटार, कंपाऊड वॉल यांच्यासह भाजी मार्केट ओटा, मार्केट यार्ड, फ्रुट मार्केट विकसित करणे अशा एकूण सुमारे ९ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध २९ पायाभूत सुविधांच्या विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व पाहणी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, हुसेन शेख, भोलाशेठ लोणारी,शहराध्यक्ष दिपक लोणारी,प्रवीण बनकर, शीतल शिंदे, निसार शेख, मुश्ताक शेख, अमजद शेख, शफीक शेख, सलीम मुकादम, अजीज शेख,मलिक मेमबर,मुश्रीफ शहा, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, प्रसाद पाटील, प्रवीण पहिलवान, प्रशांत शिंदे, भाऊसाहेब धनवटे, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गोटू मांजरे, योगेश सोनवणे, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील, उपअभियंता उमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, विकासाच्या कामाना स्थगिती देण्यात येऊ नये याबाबत राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे. तसेच कोर्टात देखील याचिका दाखल केली आहे. जनहिताची विकासाची कामे रद्द होऊ देणार नाही. सरकार येते जाते त्याची चिंता आपल्याला नाही मात्र काम बंद केली त्याची चिंता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, येवला शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कोट्यवधी रुपयांची विकासाची कामे केली आहे. तसेच यापुढील काळातही नागरिकांच्या मागणी नुसार विकासाची सर्व कामे मार्गी लावण्यात येतील. तसेच येवला शहराचा वाढता विस्तार बघता येवला साठवण तलावाची क्षमता अधिक वाढविण्यासाठी आपले प्रयत्न आहे. त्या माध्यमातून अधिक पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, येवल्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी येवला ३० खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. याठिकाणी कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लांटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच लवकरच शहरात नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून दोन दवाखाने सुरू करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत विकासाची कामे मार्गी लावणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.